‘त्या’ आमदारांना सभागृहाबाहेर काढा; भाजप आमदार लोढा यांची मागणी

मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील (1993 Mumbai Blast) आरोपींच्या माफीसाठी राष्ट्रपतींकडे पत्र लिहिणारे आमदार आजही विधानसभेत आहेत, अशा आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.

    मुंबई : मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील (1993 Mumbai Blast) आरोपींच्या माफीसाठी राष्ट्रपतींकडे पत्र लिहिणारे आमदार आजही विधानसभेत आहेत, अशा आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.

    राज्यातील आणि मुंबईतील एकूणच परिस्थितीवरून हिंदू समाज घाबरलेला आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची चर्चा सभागृहात होते. मात्र, त्याचवेळेस रझा अकादमीवर बंदी घालण्याची कोणतीही चर्चा सभागृहात का होत नाही. रझा अकादमीला कोण संरक्षण देत आहे, असा सवाल लोढा यांनी सभागृहात उपस्थित केला. ते पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते.

    वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी कोणी लाटल्या

    लोढा म्हणाले की, नवरात्री आणि गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे कारण सांगत निर्बंध लादले जातात. मात्र, दर शुक्रवारी रस्त्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजावर कोणतेही प्रतिबंध का लावले जात नाही अशी विचारणा त्यांनी केली. मुंबईतील कोळी भगिनींचा मत्स्य विक्रीचा व्यवसाय कोणी हिसकावून घेतला, याची सरकारने एकदा चौकशी करावी. वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी कोणी लाटल्या? याचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लोढा यांनी सभागृहात केली.