जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार संजय सावकारे विजयी

    जळगाव : आज सकाळी 10 टेबल वर जिल्ह्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये 35 कर्मचारी मतमोजणीसाठी असून, लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने करेल असं या ठिकाणी सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे 11 उमेदवार आधीच बिनविरोध झाले आहेत.

    आता 10 जागांसाठी हे मतदान झाले होते, मतमोजणीला सुरुवात झाली. काही वेळापूर्वी पहिला निकाल हाती आला असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार संजय सावकारे हे विजय झाले आहेत. भुसावळ विकास सोसायटी मधून आमदार संजय सावकारे यांनी उमेदवारी दाखल केली होती. याकरता सव्वीस मतदान असून 26 पैकी 22 मतदान हे आमदार संजय सावकारे यांना मिळाले आहे त्यामुळे आमदार संजय सावकारे विजयी घोषित झाले आहेत.