Conspiracy to make voters disappear from Mumbai! BJP's serious allegations; Possibility to ignite ward restructuring controversy

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमध्ये झालेली नागरीकरण ही बाब विचारात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता २२७ नगरसेवकां ऐवजी २३६ नगरसेवक मुंबई पालिकेत असणार आहेत. या निर्णयानंतर भाजपने टीका केली आहे. तर सेना आणि काँग्रेस नेत्यांनी मुंबईतील लोकसंख्या आणि नागरिकरन वाढले आहे. तसेंच मुंबईती भौगोलीक वाढ झाली असल्याचं म्हणत या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

  मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगर पालिकेतील प्रभाग रचनाबदल या विषयीं मह्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २००१ आणि २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. मात्र, आता याच दशकात ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमध्ये झालेली नागरीकरण ही बाब विचारात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता २२७ नगरसेवकां ऐवजी २३६ नगरसेवक मुंबई पालिकेत असणार आहेत. या निर्णयानंतर भाजपने टीका केली आहे. तर सेना नेत्यांनी मुंबईतील लोकसंख्या आणि नागरिकरन वाढले आहे. तसेंच मुंबईती भौगोलीक वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.

  नागरी सेवा-सुविधावर भार
  मुंबईसह उपनगरात लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देताना नगरसेवकांवर भार येतो. त्यामुळे राज्य सरकारने महानगर पालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाने याला एकमताने मान्यता दिली. या निर्णयामुळे २२७ नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार आहे. तर राजकीय हेतूने हा निर्णय घेतला असून सत्ताधारी शिवसेना निवडणुकीला घाबरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.

  भाजपाची टीका

  बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबई महानगरपालिकेत २२७ नगरसेवक आहेत, परंतु मागील दहा वर्षात जनगणना झाली नसल्यामुळे मुंबईची एकूण लोकसंख्या किती आहे हा बरोबर आकडा सांगता येत नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेतील २२७ नगरसेवक ऐवजी आता २३६ नगरसेवक असणार आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारने म्हटले आहे, तर दुसरीकडे भाजपाने मात्र यावर सडकून टीका केली आहे. “पराभवाच्या भीतीने किंवा डोळ्यासमोर हार दिसत असल्यामुळेच राज्य सरकार आणि मुख्यतः शिवसेना घाबरत आहे, आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचं प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.” तर “हा निर्णय कोणत्या निकश्यावर घेतला, याबाबत याचा जाब आम्ही राज्य सरकारलाच विचारू असं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.” तसेंच “देशात जनगणना झाली नसताना लोकसंख्या कुठे वाढली, कुठे वॉर्ड वाढणार कुठे कमी होणार हे सरकारने सांगितलेले नाही. प्रशासनाला हाताशी धरून असुरक्षितता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांना पराभव दिसू लागला आहे. यासाठी ही नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्या पद्धतीने कामकाज सुरु आहे यामुळे मुंबईकरांच्या मनात एक वेगळा संदेश गेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.”

  शिवसेना नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत

  २०११ नंतर जनगणना झाली नाही, त्यामुळे मागील दहा वर्षात “मुंबईची लोकसंख्या वाढली आहे तसेच जनतेला नागरी सुविधा देताना नगरसेवक यांच्यावर भार येतोय, त्यामुळे प्रभाग रचनेत बदल करून २२७ ऐवजी आता २३६ मुंबई पालिकेत नगरसेवक असणार आहे, त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच आहे असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.”

  विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा निर्णयाचे केले स्वागत

  दुसरीकडे या निर्णयाचे स्वागत महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या व राज्यात सत्तधारी असलेल्या महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वागत केले आहे. “लोकसंख्येच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. काही प्रभागात कमी मतदार तर काही प्रभागात जास्त मतदार होते. सर्व विभागात समान मतदार असल्यास आणि जास्त नगरसेवक असल्याने संपूर्ण मुंबईचा चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकणार आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.” तसेच पालिकेच्या निवडणूकीत नगरसेवकांची कामे बघून मतदान केले जाते. पालिकेत गेल्या पाच वर्षात केलेले काम तसेच महाविकास आघाडीचे काम बघून महाविकास आघडीला त्याचा फायदा होईल. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक वाढतील. त्यामुळे काँग्रेसच्या पाठींब्याशिवाय मुंबईचा महापौर बनू शकणार नाही, असे रवी राजा यांनी म्हटले आहे

  मुंबईची लोकसंख्या वाढली
  मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सोयी सुविधा पुरवताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. परिणामी, लोकांचा रोष वाढतो. लोकप्रतिनिधींकडून याबाबत तक्रारी येऊ लागल्याने प्रभागांच्या विभाजनावर मुंबई महापालिकेने दिला आहे. आधीच पी उत्तर विभागाचे मालाड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता ९ प्रभागांच्या वाढीचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. सन २००१ आणि २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही. मात्र, आता याच दशकात ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमध्ये झालेली नागरीकरण ही बाब विचारात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या ९ ने वाढणार असल्याने सदस्य संख्या आता २३६ होणार आहे.

  सध्या पलिकेतील संख्याबळ
  शिवसेना – ९७
  भाजपा – ८३
  काँग्रेस – २९
  राष्ट्रवादी – ८
  समाजवादी – ६
  एमआयएम – २
  मनसे – १