
घराच्या ढिगाऱ्यात इतर लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधुन दुसरी मोठी अपघाताची बातमी समोर येत आहे. काल कानपूरमधुनही एक कपडा मार्केटला भीषण आगा लागल्याची दुर्घटना ताजी असतानाच आता बुलंदशहर एका फटाक्याच्या फॅक्ट्रीत स्फोट (Blast firecrackers Factory) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेक लोक जखमी आहेत.
कुठे घडली घटना
बुलंदशहर मधील नगर कोतवाली परिसरातील नया गावात बांधलेल्या घरात फटाके बनवताना स्फोट झाला. हा स्फोट जोरदार होता की यावेळी घर पूर्णपणे जमीनदोस्त झालं. घराच्या ढिगाऱ्यात इतर लोक गाडले गेल्याचे सांगण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती पण नंतर घरात अवैध फटाके बनवण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. या फटाक्यांना आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले.
बुलंदशहरचे एसपी श्लोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 112 क्रमांकावर सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटस्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सध्या अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीम बचाव कार्यासोबतच घटनेच्या कारणाचा तपास करत आहेत.