हिंसेतच चिंतेची बातमी – मुंबईला बॉम्बस्फोटांनी हदरवण्याची धमकी, रेल्वे पोलीस आयुक्तांनी ट्विट करुन दिला अलर्ट, रेल्वे स्टेशनांच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ

मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तांनी स्वता धमकीच्या कॉलबाबत माहिती दिली. खालिद यांनी ट्विट करत बांद्रा रेल्वे स्टेशनवर आलेल्या निनावी फोन कॉलची माहिती दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करण्यात आला असून, सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून, नागरिकांनी घाबरुन जून नये, से आवाहनही त्यांनी केले आहे.

    मुंबई- राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये, आणखी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला (Mumbai)  बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या बांद्रा रेल्वे स्टेशनवर, रेल्वे पोलिसांना ( Mumbai railway Police) एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली आहे. संपूर्ण शहराला बॉम्बस्फोटांनी उडवून देण्याची धमकी या माथेफिरुने दिली आहे. (Mumbai Railway Police Commissioner )

    या फोन कॉलनंतर पोलीस सतर्क झाले असून, सर्व स्टेशनांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व रेल्वे स्टेशनांवर सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेकडून सर्व सुरक्षा यंत्रणांना या फोन कॉलबाबत माहिती देण्यात आली आहे.

    घाबरण्याची गरज नाही, रेल्वे पोलीस आयुक्तांचे आवाहन

    मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तांनी स्वता धमकीच्या कॉलबाबत माहिती दिली. खालिद यांनी ट्विट करत बांद्रा रेल्वे स्टेशनवर आलेल्या निनावी फोन कॉलची माहिती दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करण्यात आला असून, सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असून, नागरिकांनी घाबरुन जून नये, से आवाहनही त्यांनी केले आहे.

    २६-११ तारीख जवळ येत असल्याने पोलीसही सतर्क

    २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. ती तारीखही जवळ येत असल्याने सर्व बाजूंनी सतर्कता बाळगण्यात येते आहे. बॉम्बस्फोटांच्या या धमकीच्या कॉलला गांभिर्याने घेण्यात आले असून, सर्व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.