कोरोना लस घेतल्यावर मृत्यू…बिल गेट्ससह अदर पूनावालांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉ. स्नेहल लुनावत त्यांचे वडील दिलीप लुनावत यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयातने याचिकेची दखल घेतली आहे.

    मुंबई  : कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत एका पित्याने मुंबई उच्च न्यायालयात (Mumabi High Court) याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीचा मृत्यू केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) चुकीमुळे झाली असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बिल गेट्स (Bill Gates) आणि ‘सिरम’चे अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांना नोटीस बजावली आहे.

    नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉ. स्नेहल लुनावत त्यांचे वडील दिलीप लुनावत यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयातने याचिकेची दखल घेतली आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्या  लुनावत यांनी याचिकेत आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणी नुकसानभरपाई म्हणून सिरमने 1000 कोटींची रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे.  तसेच ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI) आणि एम्स यांनी लशीचा दुष्परिणाम होत नसल्याचे सांगत चुकीची माहिती दिली. राज्य सरकारनेदेखील कोणतीही चाचणी न करता लस उपलब्ध केली. या त्याशिवाय, गुगल, युट्यूब, मेटा सारख्या कंपन्यांनी कोरोना लसीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे लपवून ठेवले. त्यामुळे त्यांच्यावरही केंद्राने कारवाई अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.