New Covid variant Omicron: Dombivali followed by Pune found six patients of Omicron; Excitement in Maharashtra

देशात कोरोनाच्या ऑमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर रुग्णसंख्या ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे धोका वाढत असतानाच दुसरीकडे काही राज्यांत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली असून त्यासाठीच केंद्राने संबंधित राज्यांना सतर्क केले आहे. ओमिक्रॉनचा धोका असतानाच देशातील २७ जिल्ह्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना पत्र लिहिले आहे.(Booster Dos Fails in America! In India, 32 patients with omecron and corona patients are growing rapidly, adding to the worries; Alert to ten states).

  दिल्ली : देशात कोरोनाच्या ऑमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर रुग्णसंख्या ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे धोका वाढत असतानाच दुसरीकडे काही राज्यांत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली असून त्यासाठीच केंद्राने संबंधित राज्यांना सतर्क केले आहे. ओमिक्रॉनचा धोका असतानाच देशातील २७ जिल्ह्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना पत्र लिहिले आहे.(Booster Dos Fails in America! In India, 32 patients with omecron and corona patients are growing rapidly, adding to the worries; Alert to ten states).

  स्थितीनुसार नाइट कर्फ्यू व अन्य निर्बंध लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.ठराविक जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असून असल्यानेच आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहिले. केरळ , मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यांत गेल्या दोन आठवड्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक असून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  राज्यांना निर्देश

  आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात. विदेशातून येणाऱ्यांवर नजर ठेवावी. संक्रमित रुग्ण व संपर्कात असलेल्यांचे निरीक्षण करावे. कोविड सतर्कता नियमांचे कठोरतेने पालन करावे अशा सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

  राज्यात १७ जण ऑमायक्रॉनबाधित

  ऑमायक्रॉन संसर्गाचे राज्यात आणखी ७ रुग्ण आढळले. यात मुंबईत ३ तर पिंपरी – चिंचवड शहरात ४ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आजवर एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या झाली आहे.

  ८९ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

  अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ९७६८ प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या १२४९ अशा एकूण १०९२७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. अतिजोखमीच्या देशातून आलेल्या व कोरोनाबाधित असलेल्या २० प्रवाशांची तर इतर देशातून आलेल्या पण कोरोना संसर्ग झालेल्या ५ अशा एकूण २५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. परदेशातून आलेले व राज्यातील बाधितांमधील एकूण ८९ नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

  दिल्लीतही आढळला दुसरा रुग्ण

  दिल्लीत ऑमायक्रॉन प्रकाराची दुसरे प्रकरण समोर आले आहे. झिम्बाब्वेहून दिल्लीत आलेल्या प्रवाशाच्या जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल समोर आल्यानंतर रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. झिम्बाब्वेहून दिल्लीला पोहोचलेल्या रुग्णाच्या प्रवासाच्या हिस्ट्रीमध्ये आफ्रिकेचाही समावेश आहे.

  ३६ प्रयोगशाळा सज्ज

  कोरोनानंतर जगात संसर्ग होत असलेल्या नव्या ऑमायक्रॉन व्हेरिएंटची चाचणी करण्यासाठी देशात 36 प्रयोगशाळा सज्ज झाल्या आहेत. यात एकाच दिवशी ३० हजार नमुन्यांची तपासणी होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

  अमेरिकेत बूस्टर डोस फेल

  अमेरिकेत ऑमीक्रोन व्हेरिएंटने प्रशासनाच्या चिंतेत चांगलीच भर टाकली आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस त्याचसोबत बूस्टर डोस घेतलेले लोक नव्या व्हेरिएंटच्या विळख्यात येताना दिसत आहेत. अमेरिकेत 43 पेक्षा जास्त संक्रमित आढळले आहे. या रुग्णांचे पूर्ण लसीकरण झालेले असतानाही त्यांना ऑमीक्रोनची लागण झाली आहे. बूस्टर डोस घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटची लागण होत आहे.