कोयता गॅंगच्या दोघांनाही पोलिसांनी केले अटक

  फलटण : शहरामध्ये कोयत्याने दहशत करून व्यापारी यांना लुटणारे व खंडणी मागणारे सराईत आरोपी फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून ४ तासांत जेरबंद करून त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी दिली.
  सर्वपक्षीय लोकांचे आज निवेदन
  रोहित नवीन काकडे व एक अल्पवयीन हे दोघे रा. मंगळवार पेठ, फलटण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. व्यापाऱ्यांनी जे लोक त्रास देतात किंवा पैशांची मागणी करीत आहेत अशा लोकांच्या तक्रारी करा, असे आवाहन केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे. दरम्यान, आज सर्व व्यापारी व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व आरपीआय तसेच सर्वपक्षीय लोक आज निवेदन देताना उपस्थित होते.
  सुहास मॅचिंग सेंटर दुकानात तक्रारदार
  रविवार दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सुमारास १३५ रविवार पेठ उघड्या मारुती मंदिरासमोर फलटण येथे सुहास मॅचिंग सेंटर दुकानात तक्रारदार माझे वडील अरिजय दोशी हे
  गि-हाईकाला अस्तर देत असताना रोहित नवीन काकडे व एक अल्पवयीन हे दोघे रा. मंगळवार पेठ फलटण  हातात कोयता घेऊन व त्याचा मित्र हातात तलवार घेऊन येथून याने माझे वडील अरिजय यांना कोयता अंगावर उगारून कोयत्याचा धाक दाखवून दुकानाचे काऊन्टरमधून अंदाजे २५,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेऊन गेले आहेत.
  कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला हप्ता
  तसेच वैभव रमनलाल दोशी वय ५३ वर्षे यांचे फुलचंद दुलचंद दोशी यांचे किराणा मालाचे दुकानात जाऊन वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला महिन्याला ३०००/- रुपये हप्ता दिला पाहिजे. तरच तुम्ही धंदा करू शकाल व तुम्ही जर ही रक्कम आम्हास दिली नाही तर याच कोयत्याने तुम्हाला जिवे मारू, अशी दमदाटी केली होती. तसेच, तौसिफ निजामुद्दीत शेख यांचे दुकानातून बॅट हिसकावून घेऊन दुकानातून बाहेर जाऊन दुकानावर दगडफेक केली होती, वरीलप्रमाणे गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे दाखल रोजी दाखल करण्यात आला होता. यावरून वरील दोघांना ताब्यात घेतले आहे.
  दरम्यान सदरचा गुन्हा घडले नंतर घटनास्थळी पोलीस ठाणेकडील महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तत्काळ जाऊन सदर ठिकाणी उ, पलब्ध असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत दोन आरोपी असुन त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे आरोपी यांचे शोध कामी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व इतर स्टाफचे खास पथके तयार करुन गोपनिय माहीती व आरोपी यांचे मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करुन सदर आरोपी हे मुंबई करीता पळुन जाणार असले बाबत गोपनिय माहीती मिळाली त्याप्रमाणे मिळाले बातमीचे आधारे पोलीस पथकाने सदर आरोपी यांचा पाठलाग करून लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास श्री परितोष दातीर, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत.
  जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांचे वतीने सातारा जिल्हयामधील सर्व नागरिक व दुकानदार यांना आवाहान करण्यात येते की, अशा प्रकारचे घटनांना घाबरून न जाता जर असे कोणी गुन्हेगार गुन्हे अथवा धमकी देत असतील तर त्यांचे भितीखाली व दबावाखाली न जाता याबाबत तत्काळ नजीकच्या पोलीस ठाणे यांना कळवाचे पोलीस प्रशासन यांची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणारे इसमांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.