कुस्तीपटुंच्या आंदोलन प्रकरणी ट्विस्ट; ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटुंविरोधातच दाखल केली याचिका, विनेश, साक्षीवर केले ‘हे’ आरोप

कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे. असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

    भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij bhushan Singh) यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (delhi high court ) याचिका दाखल केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या याचिकेत विनेश फोगट (vinesh phogat) आणि साक्षी मलिकसह (sakshi malik) अनेक कुस्तीपटूंची नावे आरोपी म्हणून ठेवली आहेत. आपल्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करून न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे.

    कशावरुन सुरू होतं आंदोलन?

    कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक ऑलिम्पिकपटू सध्या दिल्लीतील जतंरमंतर मैदानात १८ जानेवारीपासून आंदोलनाला बसले होते. यामध्ये विनेश फोगाटनं बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचं आणि महिला प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत बृजभूषण सिंह यांच्यासह फेडरेशनमधील इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत एकही कुस्तीपटू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.