बहिणीच्या हळदीत डान्स करताना भावाचा जागीच मृत्यू; मृतदेह घरात असतानाच पार पडलं लग्न,अन्….

नाचताना तो पडला आणि बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रेफर केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

ज्या बहिणीच्या लग्नासाठी सगळी तयारी केली. आनंदाने तिला सासरी पाठवण्याचं स्वप्न पाहिलं त्या बहिणीचं लग्न होताना पाहणं भावाच्या नशिबी नव्हतं बहुतेक. लग्न होण्याआधीच नियतीनं भावाला त्याच्या बहिणीपासुन दूर केलं.  (Brother Died While Dancing In Sister Haldi Function )हृदय पिळवटून टाकणारी घटना उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये घडली आहे. नेमंक असं काय झालं लग्नघरी की आनंदाचं वातावरण क्षणात दु:खात परिवर्तीत झालं बघुया.

बहिणीच्या हळदीच्या दिवशी भावाचा मृत्यू

सिद्धार्थनगर लग्नाच्या दिवशी वधूला हळद लावली जात होती. घरात होम थिएटरवर गाणं चालू होतं. मुले, मुली, महिला नाचत होत्या. वधूचा भाऊ बैजू (19) हाही आनंदाने नाचत होता. नाचताना तो पडला आणि बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रेफर केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका आणि क्रॅनियोसेरेब्रल फुटल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इकडे वधूच्या भावाच्या मृत्यूची बातमी येताच घरात खळबळ उडाली. 

आनंदाचे रूपांतर शोकात 

आनंदात नाचणाऱ्या भावाचा अचानक मृत्यू झाल्याने घरातलं वातावरण आंनदाच वातावरण क्षणात दुखाच्या वातावरणात बदलले. मात्र,  कुटुंबीयांनी मुलाच मृतदेह घरात ठेवला आणि लग्नाचे विधी उरकून वधुची सासरी पाठवणी केली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.  भावाचा अचानक मृत्यू झाल्याचे वधू पूजाला मोठा धक्का बसला असुन ती त्याला टक लावून बघून  रडतच राहिली, हे पाहून घरातील लोक आणि लग्नाला आलेले लोक जोरजोरात रडू लागले. मंगळवारी सकाळी निरोपाच्या वेळी नववधू भावाच्या मृतदेहाला मिठी मारून रडतच राहिली. रडत रडत ती म्हणत होती की, डोळे उघड बाबू! मी जात आहे.  ऐन लग्नाच्या दिवशी आपल्या भावाला गमाववं लागल्याने नववधुचं रडणं बघुन उपस्थितांचेही डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाही.