अठरा तासांच्या थरारानंतर अखेर सांगलीत गवा जेरबंद

कसबे डिग्रज आणि सांगलीवाडी परिसरातील शेतात गेल्या चार दिवसापासून फिरत असणारा गवा रेडा हा मंगळवारी पहाटे सांगली शहरात आला. सांगली शहरातील अनेक मुख्य वस्तीतून तो वसंतदादा मार्केट यार्ड येथे आला. मार्केट यार्डातील एका बाजूला असणाऱ्या सेंट्रल वेअर हाऊसच्या बोळात तो अडकून राहिला व त्याठिकाणाहून तो बाहेर पडू शकणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे हा गवा रेडा याठिकाणीच अडकून पडला पण याठिकाणाहून त्याला तात्काळ पकडण्यात मात्र तो बाहेर पडू शकणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

    सांगली : मंगळवारी पहाटेपासून सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या वसंतदादा मार्केट यार्ड येथे गवा आल्याने सांगलीकरांचे धाबे दणादणाले होते. पण अखेर त्याला कोणतीही इजा न करता पकडण्यात आले आहे. तब्बल १८ तासाच्या थरारानंतर गवा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास त्याला वनविभागाने आणलेल्या कंटेनरमध्ये पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात नेण्यात आले.

    कसबे डिग्रज आणि सांगलीवाडी परिसरातील शेतात गेल्या चार दिवसापासून फिरत असणारा गवा हा मंगळवारी पहाटे सांगली शहरात आला. सांगली शहरातील अनेक मुख्य वस्तीतून तो वसंतदादा मार्केट यार्ड येथे आला. मार्केट यार्डातील एका बाजूला असणाऱ्या सेंट्रल वेअर हाऊसच्या बोळात तो अडकून राहिला व त्याठिकाणाहून तो बाहेर पडू शकणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे हा गवा याठिकाणीच अडकून पडला पण याठिकाणाहून त्याला तात्काळ पकडण्यात मात्र तो बाहेर पडू शकणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे हा गवा याठिकाणीच अडकून पडला पण याठिकाणाहून त्याला तात्काळ पकडण्यात मात्र वनविभागाला आणि पुणे येथील रेसक्यू पोर्स तसेच प्रयाणीमित्र संघटनेला यश आले नाही. दुपारपर्यंत त्याला यासाठी गहन चर्चा सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरा हा गवा पकडल्यानंतर त्याला ताकाळ पुर्णपणे बंदोबस्तात नैसर्गिक अधिवासात वनविभागाच्या कंटेनर मधून नेण्यात आले.

    बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत

    सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल होते, मात्र गवा आल्याने मंगळवारी दिवसभर व्यवहार ठप्प राहिले होते, परिसरात दिवसभर जमावबंदी असल्याने व्यापारी, वाहतूकदार, गाडीवान, हमाल, तोलाईदार यांना फटका बसला होता, मात्र मंगळवारी रात्री वनविभागाला गवा सुरक्षित पकडण्यात यश आल्याने आज बुधवारी बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत झाले.