A womans throat slit from a love affair

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच हात पाय बांधून आणि गळा आवळुन ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून दोघांवर ही गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून दोरीने गळा आवळून पलंगावरच ठार केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे उघडकीस आलीय.या घटनेने परिसरात खळबळ  पसरली असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला गजाआड केले आहे(Buldhana - Husband who was an obstacle in an immoral relationship was killed by his wife with the help of his lover; Accused arrested with wife and boyfriend).

    अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच हात पाय बांधून आणि गळा आवळुन ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून दोघांवर ही गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून दोरीने गळा आवळून पलंगावरच ठार केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे उघडकीस आलीय.या घटनेने परिसरात खळबळ  पसरली असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला गजाआड केले आहे(Buldhana – Husband who was an obstacle in an immoral relationship was killed by his wife with the help of his lover; Accused arrested with wife and boyfriend).

    साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोरेगाव येथील मृतक दत्तात्रय कव्हळे च्या पत्नीचे गावातीलच आरोपी एजाज खान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण तिचा पती दत्तात्रय याला लागली होती. दरम्यान गांवात गवगवा झाल्याने आरोपी एजाजने माफी मागितली होती. आणि त्यावर पडदा पडला होता. तर काही दिवस मृतक आणि आरोपी पत्नी हे दोघेही बाहेरगावी कामाला गेले. मात्र शेती खरेदी साठी ते दोघे गोरेगाव येथे परत आले असता मृतकची पत्नी आणि आरोपी एजाज च्या प्रेमाला पुन्हा बहर आला.

    दरम्यान काल मृतक हा मुलीचा दहावी चा पेपर असल्याने तिला घेऊन गेला होता. मात्र परत घरी आल्यावर यावेळी दत्तात्रय आणि त्यांच्या पत्नीचे शाब्दिक भांडण झाले. त्यावेळी तेथे असलेल्या पत्नीचा प्रियकर एजाज आणि पत्नीने दोघांनी मिळून घरातील पलंगावर त्याचे हातपाय बांधले आणि दोरीने गळा आवळून खून केला.

    ही बाब मृतक दत्तात्रयच्या आईच्या लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दिली आणि आरोपी पत्नी सह आरोपी एजाज खान पठाण वर गुन्हा दाखल करून साखरखेर्डा पोलिसांनी दोघांना ही अटक केली आहे.