जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये बस दरीत कोसळली, आठ विद्यार्थी जखमी

धमपूरच्या जिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी भरती दाखल आले आहे. रस्त्याच्या अवस्था अत्यंत खराब असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

    जम्मू काश्मीर मधून बस अपघाताची एक बातमी समोर आली आहे. उधमपूर जिल्ह्यात मसोराजवळ
    मसोराजवळ एक मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत पडल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही बस बर्मीन गावातून उधमपूरला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

    जम्मू काश्मीरच्या मसोराजवळ सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. त्यापैकी 12 शाळकरी विद्यार्थी आहेत. या अपघातात ८ विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना नजीकच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी भरती दाखल आले आहे. रस्त्याच्या अवस्था अत्यंत खराब असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.