कॅब कंपनीच्या सीईओंनी चालवली कॅब, उबर इंडियाचे प्रमुख प्रभजीत यांनी कॅब ड्रायव्हर होऊन दिला आश्चर्याचा धक्का, सोशल मीडियावर कौतुक

कंपनीची एक कॅब चालवून सीईओ प्रभजीत सिंह यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांची ग्राहकांशी अशी भेट सध्या शोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

    नवी दिल्ली : तुम्ही कधी उबर बुक केली आहेत का? जर तुम्ही उबर बुक केली आणि तुम्हाला नेण्यासाठी उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचा सीईओ प्रभजीत सिंह ड्रायव्हर म्हणून तुम्हाला न्यायला आला तर. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असा प्रकार घडलाय. कंपनीची एक कॅब चालवून सीईओ प्रभजीत सिंह यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांची ग्राहकांशी अशी भेट सध्या शोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

    आश्चर्यकारक भेट उबर इंडियाचे सीईओ प्रभजीत सिंह यांच्यासोबत झालेल्या या भेटीची माहिती लिंक्डइन युझर अनन्या द्विदेवीने शेअर केली आहे. या दोघांचा फोटो तिने शेअर केला आहे. बऱ्याच कालावधीनंतर ऑफिसला जाण्यासाठी तिने उबर बुक केली. नंतर लक्षात आले की हा ड्रायव्हर तर प्रभजीत सिंहसारखा दिसतोय. हा तर उबर इंडियाचा सीईओ आहे. खात्री करण्यासाठी तिने नेटवर त्याचे नाव आणि फोटो चेक केला. जेव्हा तिला सत्यता पटली तेव्हा तिचा आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

    उबर इंडियानेही दिले सोशल मीडियावर उत्तर
    अनन्या या पोस्टवर उबर इंडियाच्या अधिकृत प्रोफाईलवरुन उत्तरही देण्यात आले. प्रभजीत सिंह यांच्यासोबत प्रवास केल्याबद्दल भार. प्रभजीत यांना पुढच्या सीटवर पाहून आम्हाला मात्र आश्चर्य वाटलेले नाही. सोशल मीडियावर आता या दोन्ही पोस्टचं कौतुक होतं आहे.