नारायण राणेंना ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे कायदेशीर अपराध, सिंधुदुर्ग पोलिस कायदा विसरलेले दिसते; देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटक प्रकरणावरून व्टिट करत राज्य सरकारवर टिका केली आहे.

    मुंबई : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यानी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटक प्रकरणावरून व्टिट करत राज्य सरकारवर टिका केली आहे.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

    सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस ठाण्यामध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवरच भादवि १६६अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. असं फडणवीस म्हणाले.

    भाजपा सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल

    फडणवीस यानी म्हटले आहे की, असे न केल्यास भाजपा सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा भादवि १३४ अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल असे त्यांनी म्हटले आहे.