श्री नागोबा देवाच्या यात्रेतील विविध कार्यक्रम रद्द

नागोबा यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाजन्य स्थितीमुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. चालू वर्षी ही ओमायक्रॉनचे व कोरानाचे सावट असल्याने यात्रेत दरवर्षी होणारे गजी नृत्य, भव्य कुस्ती मैदान, महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे.

    म्हसवड म्हसवड पालिकेच्या अंतर्गत येणार्या श्री नागोबा देवाची यात्रा कोरोना नियमांचे पालन करुन यंदा अगदी साध्या पध्दतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टच्या ‌देण्यात आली आहे.

    नागोबा यात्रा १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाजन्य स्थितीमुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. चालू वर्षी ही ओमायक्रॉनचे व कोरानाचे सावट असल्याने यात्रेत दरवर्षी होणारे गजी नृत्य, भव्य कुस्ती मैदान, महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे. यात्रेतील सासन काठी पूजन व पाकळणी पर्यंतचे सर्व विधी प्रशासनाच्या सर्व नियमांच्या आधीन राहून व कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहेत.

    श्री नागोबाची पाकाळणी २५ डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या कालावधीत भाविकांनी मंदिर परिसरात विनाकारण जास्त गर्दी न करता, कोराना संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन नागोबा देवस्थान ट्रस्ट, माण तालुका मार्केट कमिटी, म्हसवड नगरपरिषद व सातारा जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.