Cash and expensive mobiles looted with a knife: Incident at Bhandara

पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडा-याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलिसांना तीनपैकी दोन आरोपींना अटक करण्यास यश आले आहे.

    भंडारा : भंडारा शहरात दुचाकीला धडक देत चाकूचा धाक दाखवून खिशातील नगदी रक्कम चोरण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीची दखल घेत भंडारा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भंडारा शहरातील मेंढा बायपास रोडवर घडली आहे.

    सुदाम देशकर हे त्यांच्या शेतातील घरून दुचाकीने सिंधी कॉलनी मेंढा रस्त्याने जात होते. तेवढ्यातच इंडियन गॅस गोडाऊनजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुदाम देशकर हे जमिनीवर  पडले.
    तेवढ्यातच दुचाकीवरील तरुणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, एकाने तर रस्त्यालगत असलेला गोटा उचलून सुदाम यांच्या डोक्यावर मारला. यात सुदाम देशमुख हे जखमी झाले. नंतर, त्यांनी सुदाम यांच्याकडील २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. आणि त्या चोरटयांनी तेथून पळ काढला.  
    या सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेत सुदाम यांनी भंडारा पोलिसांनी चौकीत तक्रार नोंदविली आहे. तरी,  त्याची नावे आनंद गोपाळ इळपाते (२१) वर्षे व अभिजीत सुरेश तांडेकर वर्षे (२१) असून ते दोघेही आंबेडकर वार्ड, भंडारा येथील रहिवासी आहेत. तसेच, फरार आरोपीचा शोध भंडारा पोलीस घेत आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक जगणे करीत आहे.