bipin rawat

हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी नेमके घटनास्थळी काय घडले, त्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रत्यक्षदर्शी असे आहेत, की ज्यांनी जनरल बिपीन रावत यांना पाहिलेही, मात्र त्यांना ते ओळखू शकले नाहीत. अशाच एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की एक माणूस प्रचंड जखमी होता, पण जिवंत होता. पाणी मागत होता, पण आमच्याकडे त्याला देण्यासाठी पाणीही नव्हते. नंतर समजले की ते जनरल बिपीन रावत होते. याचे मला इतके दुख झाले की, रात्रभर झोपू शकलो नाही, असे त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले(CDS Rawat's last moments ... We couldn't even give water to the man who did so much for the country; An eye-opening experience for eyewitnesses).

  नवी दिल्ली : हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी नेमके घटनास्थळी काय घडले, त्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रत्यक्षदर्शी असे आहेत, की ज्यांनी जनरल बिपीन रावत यांना पाहिलेही, मात्र त्यांना ते ओळखू शकले नाहीत. अशाच एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की एक माणूस प्रचंड जखमी होता, पण जिवंत होता. पाणी मागत होता, पण आमच्याकडे त्याला देण्यासाठी पाणीही नव्हते. नंतर समजले की ते जनरल बिपीन रावत होते. याचे मला इतके दुख झाले की, रात्रभर झोपू शकलो नाही, असे त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले(CDS Rawat’s last moments … We couldn’t even give water to the man who did so much for the country; An eye-opening experience for eyewitnesses).

  कन्न्रमध्ये राहणारे कंत्राटदार शिवकुमार अपघातावेळी, निलगिरी पर्वतात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या भावाच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी आग लागलेले हेलिकॉप्टर कोसळताना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी पोहचण्यास अडचणी आल्या. तिथे गेल्यावर तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत हेलिकॉप्टरमधून पडल्याचे त्यांनी सांगितले. एक व्यक्ती त्यातही जिवंत होता. त्याला ओळखू शकत नव्हतो. तो जिवंत होता आणि पाणी मागत होता. त्यानंतर एका चादरीत घालून त्या व्यक्तीला बचाव कार्य करणारी टीम आणि स्थानिक घेऊन निघून गेले.

  नंतर तीन तासांनी मला कुणीलतरी त्यांचा फोटो दाखवला आणि विचारले, की तू ज्यांच्याशी बोलत होता, ते हे होते का, तेव्हा कळले की ते जनरल बिपीन रावत होते. ज्या माणसाने देशासाठी एवढे काही केले, त्याला पाणीही पाजू शकलो नाही, याचे दुख: आहे. रात्रभर झोपू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.

  दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की घराजवळच हेलिकॉप्टर कोसळले, तिथले तापमान वाढले होते. काय करायचे हे कळत नव्हते. आम्ही झाडांच्या फांद्या तुटल्याचा आवाज ऐकला. एक माणूस ओरडून मदतीची याचना करीत होता. त्यानंतर सिलिंडर स्फोटासारखा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
  तिसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माझ्या घराच्या दोन मीटर तारवर हेलिकॉप्टर पडले.

  नशीब की तो आणि त्याची मुले त्या ठिकाणी नव्हती. दुर्घटनेनंतर ५०० मीचर अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी केली. स्थानिकांना तिथे जाण्याची परनागी देण्यात आली नाही. एअरफोर्सचे अधिकारी हेलिकॉप्टरचे तुकडे गोळा करीत होते.