Cement pillars on railway tracks; Conspiracy to overturn Rajdhani Express in Gujarat

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी एक्सप्रेस या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. हा खांब हेतुपरस्सर रुळावर टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता(Cement pillars on railway tracks; Conspiracy to overturn Rajdhani Express in Gujarat).

    वलसाड : गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी एक्सप्रेस या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. हा खांब हेतुपरस्सर रुळावर टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता(Cement pillars on railway tracks; Conspiracy to overturn Rajdhani Express in Gujarat).

    अनेक गाड्यांचा खोळंबा

    घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे राजधानीसह सर्व गाड्या थांबवण्यात आल्याने खोळंबा झाला होता.

    रेल्वे स्थानकाच्या तारखुंटाजवळ काही अज्ञातांनी हा खांब उखडून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर टाकल्याचे समजते. दरम्यान, तिथून राजधानी एक्स्प्रेस गेली. ती धडकल्याने सिमेंटचा खांब तुटला. राजधानी एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट मोहम्मद सिद्दीकी यांनी अतुल रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टरला घटनेची माहिती दिली.

    हे सुद्धा वाचा
    • 2022