रेती चोरांचा धुडगुस; तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त

    चंद्रपूर (Chandrapur) : जिल्ह्यात रेती तस्करांचा धुडगुस वाढला आहे.जिल्ह्यातील कोरपना , गोंडपिपरी तालुक्यात रेती चोरीचे प्रमाण वाढीस लागला आहे.चिंचोली रेती घाटावर मंडळ अधिकारी किशोर नेवले यांनी धाड टाकली.

    अवैधरीत्या रेतीची वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. एकीकडे जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव रखडले आहेत. मात्र रेतीचोरांचा हैदोस रोखण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे.