जर्मनीतल्या आयर्नमॅन स्पर्धेत चंद्रपूरच्या डॅाक्टांरानी मिळवलं यश

या स्पर्धेत 1.91 किलोमीटर पोहणे, 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे या तिन्ही प्रकारात त्यांनी यश मिळवत पुरस्कारा आपल्या नावे केले. थेट जर्मनीत चंद्रपूरचं नाव उंचविणाऱ्या या डॉक्टरांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. '

    चंद्रपूर : जर्मनीतल्या ड्यूसबर्ग येथे नुकतीच आयर्न मॅन आयोजीन करण्यात आली होती. या स्पर्धेत चंद्रपूरच्या 8 डॅाक्टरांनी यश मिळवलं आहे. पोहणे, सायकलींग, धावणे या क्रिडा प्रकारात त्यांनी विशेष कामगिरी करत पुरस्कारावर नाव कोरलं. त्यांच्या यशामुळे चंद्रपूरच्या डॅाक्टरांनी जिल्ह्याच नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावल आहे.

    जर्मनीतील ड्यूसबर्ग येथे 29 ऑगस्टला ही आयर्न मॅन ७०.३ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्प्रर्धेत चंद्रपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्नित 8 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 1.91 किलोमीटर पोहणे, 91 किलोमीटर सायकलींग आणि 21 किलोमीटर धावणे या तिन्ही प्रकारात त्यांनी यश मिळवत पुरस्कारा आपल्या नावे केले. थेट जर्मनीत चंद्रपूरचं नाव उंचविणाऱ्या या डॉक्टरांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. ‘आयर्नमॅन’ ही ट्रायथलॉन यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन सह अनेक संस्थांच्या वतीने या स्पर्धक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आहे. डॉ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. रिजवान अली शिवजी, डॉ. नबा शिवजी, डॉ. अभय राठोड यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. या स्पर्धेसाठी त्यांन तब्बल 9 महिण्यापासून सराव सुरू केला होता.