चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी कायम राहणार; कोर्टाचा निर्णय

काँग्रेसचे रवींद्र भोयर यांनी बावनकुळे यांच्या उमेदवारीवरून आर. विमला यांच्याकडे तक्रार दाखल केली. बावनकुळे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथील ट्रस्टवर पदाधिकारी आहेत. या संस्थेला विकासासाठी तीर्थस्थळ विकास निधीतून महाराष्ट्र शासनाकडून ३५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बावनकुळे यांचे हे पद ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे येत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, .......

  नागपूर (Nagpur) : कृषी कायद्यानंतर भाजपसमोर नवं संकट, जाट आरक्षणाच्या मागणीला जोर कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आर. विमला यांच्याकडे केली. त्यावर तब्बल पाच तास सुनावणी झाली. त्यानंतर आक्षेप फेटाळण्यात आला. निवडणूक रिंगणातील पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

  १० डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २४ नोव्हेंबर रोजी या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीदरम्यान काँग्रेसचे रवींद्र भोयर यांनी बावनकुळे यांच्या उमेदवारीवरून आर. विमला यांच्याकडे तक्रार दाखल केली. बावनकुळे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथील ट्रस्टवर पदाधिकारी आहेत. या संस्थेला विकासासाठी तीर्थस्थळ विकास निधीतून महाराष्ट्र शासनाकडून ३५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बावनकुळे यांचे हे पद ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे येत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार भोयर यांनी केली होती. यासह बावनकुळे जगदंबा बिगर शेतकरी संस्थेचेही अध्यक्ष आहेत. या पदांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात नसल्याचेही भोयर यांचे म्हणणे होते.

  म्हणून स्वीकारला अर्ज
  शासनाने तीर्थस्थळ विकास निधी म्हणून संस्थेला पैसे दिले आहेत. कुठल्याही व्यक्तीला ते दिले नाहीत. बावनकुळे यांचे पद शासकीय नसून ट्रस्टकडून त्यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे कायद्याच्या कलम १९१ नुसार हे पद लाभाचे पद म्हणता येणार नाही. या आधारावर बावनकुळे यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. भोयर यांच्याविरोधात बँकेकडून तक्रार दाखल झाल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र, ही केवळ तक्रार असून, रीतसर कुणीही आक्षेप घेतला नसल्याचे आर. विमला यांनी सांगितले. ऑनलाइन प्रतिज्ञापत्रातील आणि आम्हाला दाखविलेली माहिती यात तफावत असल्याने याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसचे सत्यजित दस्तुरे यांनी सांगितले. सुनावणीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते.

  छाननीत वैध ठरलेले उमेदवार
  -चंद्रशेखर बावनकुळे : भाजप
  -रवींद्र भोयर : काँग्रेस
  -प्रफुल्ल गुडधे : काँग्रेस
  -मंगेश देशमुख : अपक्ष
  -सुरेश दौलत रेवतकर : अपक्ष