‘चंदू चॅम्पियन’ मधील कार्तिक आर्यनचा तगडा लूक पाहून चाहते वेडे !

बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून, त्यात कार्तिकचा लूक आकर्षित आहे. या पोस्टरमध्ये लोकांच्या नजरा कार्तिकच्या परफेक्ट बॉडीवर खिळल्या आहेत.

    बॉलिवूडचा स्टार कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा हा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. त्याचप्रमाणे सध्या कार्तिक आर्यनचे एकापेक्षा एक चित्रपट पप्रदर्शित होणार आहेत. या यादीत ‘भूल भुलैया 3’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चा समावेश आहे. दरम्यान, ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचे पोस्टर आता नुकताच समोर आले असून, तो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये कार्तिक आर्यनचा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

    ‘चंदू चॅम्पियन’चे पोस्टर रिलीज
    अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे शेअर केले आहे, ज्यावर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यनची बॉडी पाहण्यासारखी आहे. लोक आता त्याची तुलना सलमान खानशी करू लागले आहे. हे शेअर करताना कार्तिकने लिहिले की, ‘चॅम्पियन येत आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि खास चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना मला खूप उत्साह आणि अभिमान वाटत आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यनचे ट्रान्सफॉर्मेशन पाहण्यासारखे आहे. ते पाहता कार्तिकने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसते आहे.

    ‘चंदू चॅम्पियन’ प्रदर्शित होणार आहे
    हा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून, त्यांनी अनेक हिट सिनेमे केले आहेत. ज्यामध्ये सलमान खानचा ‘एक था’ टायगर देखील आहे. कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची आणि त्याच्या लूकची चांगलीच जोरदार चर्चा रंगली असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.