महा SSC, HSC चा निकाल जाणून घेण्यासाठी पहा ही वेबसाइट

महाराष्ट्रत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) त्यांच्या वेबसाइटवर एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना एसएससी (इयत्ता 10) आणि HSC (वर्ग 12) निकालाची तारीख आणि वेळ या वेबसाइटद्वारे समजेल.

    महाराष्ट्र एसएससी, एचएससी निकाल 2024 च्या तारखा mahahsscboard.in वर प्रकाशित केल्या जातील, असे बोर्डाने सांगितले आहे .

    साधारणपणे, महा बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल प्रथम आणि त्यानंतर 10वीचा निकाल जाहीर केला जातो. परंतु महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यानी या आठवड्याच्या सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसएससीचा निकाल लागण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले होते . आणि एचएससीचा निकाल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो असे दर्शवले होते .

    SSC, HSC चा निकाल घोषित झाल्यावर, विद्यार्थी mahresult.nic.in आणि msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org सारख्या इतर वेबसाइटवर 10वी, 12वीचा निकाल 2024 पाहू शकतात.

     

    या वर्षी महाराष्ट्रात 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एचएससी परीक्षा दिली आहे तर 15 लाखांहून अधिक उमेदवारांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 ची तारीख आणि वेळ तसेच थेट लिंक आणि इतर तपशील येथे पहा.