
जालना : ओबीसी आरक्षणावरून जालन्यातील अंबड येथून मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत, हा कसला देव झालाय नवीन दगडाला शेंदूर लावून हा देव झाला, असा घणाघाती हल्लाबोल करीत मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला केला आहे.
ओबीसींना आरक्षण हे मंडल आयोगाने दिले असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. ओबीसींना आरक्षण देताना, त्यावेळी यशवंतराव चव्हाण होते. ओबीसींना आरक्षण मंडल आयोगाने दिले. त्यावेळेलासुद्धा या आरक्षणाला विरोध केला आणि ही मंडळी कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यानिशी काही जाती ओबीसींमध्ये समाविष्ट केल्या.
13 एप्रिल 1968 साली ओबीसींना आरक्षण मिळाले. आम्हाला घटनेने आरक्षण दिले आहे. आमची काय चुकी आहे. आम्ही काय तुझ्या बापाचे खातोय का, असा खरमरीत सवाल छगन भुजबळ यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेसुद्धा म्हणणे होते, ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे.
मी छगन भुजबळ दिवाळीतसुद्धा बेसन-भाकर खातो. सासर्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आमच्या दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिले आहे. ओबीसींची काही सगळी लोकं श्रीमंत झाली नाहीत. मराठा समाजाला नवीन नेता निर्माण झाला आहे. एक लक्षात घ्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. 58 मोर्चे निघाले, आम्ही आरक्षणाला विरोध करीत नाही. त्यावेळेला मराठा आंदोलकांनी घरे जाळली नाहीत. अरे माझी मराठा समाजाला विनंती आहे, दगडाला शेंदूर लावून कशाला पाया पडताय.
भटक्या विमुक्त जातीला आम्ही ओबीसीमध्ये घेतले. तुम्ही कायद्याने या, आमचा तुम्हाला विरोध नाही. यापेक्षा मराठा समाजाला सरकारने सर्वाधिक मदत केली आहे. सारथी संस्थेमार्फत 172 कोटी वाटले.
यांना आतासुद्धा 300 कोटी मंजूर झाले आहेत. मराठ्या विद्यार्थ्याला वसतिगृह नसेल तर 6000 रुपये मिळतात. पोलिसांचा लाठीचार्ज झाला, पण सत्तर पोलीस अडमिट झाले. याला उठवायला अगोदर गेले. पोलीसअगोदर गेले. आपण हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे. 70 पोलीस पाय घसरून पडले का, असे म्हटले आहे.
या राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जखमी पोलिसांना जाऊन विचारले पाहिजे. जखमी महिला पोलिसांवर काय वेळ आली, हे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जाऊन विचारले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलाच्या सुनेला साडी-चोळी देऊन पाठवणी केली.
70 पोलीस जखमी, गृहमंत्र्यांनी माफी मागितली, एसपींनी माफी मागितली. प्रकाश सोळंकेचे घरी जाळले, पेट्रोल बॉम्बे टाकले, दरवाजे फोडले, गाड्या पेटवल्या, हे सर्व ठरवून दिले होते. कोड नंबर दिले गेले होते. सुभाष राऊत हा ओबीसीचा कार्यकर्ता याला संरक्षण देण्यासाठी मी फोन केला. राखरांगोळी म्हणजे काय, हे मी त्यावेळेला पाहिले. संदीप क्षीरसागरचे ऑफीस फो़डून टाकले. जयदत्त क्षीरसागरचे ऑफीस फोडले.