पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री गैरहजर; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहीले नव्हते. त्यामुळे विरोधक मुख्यमंत्र्यावर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

    पुणे : देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहीले नव्हते.

    त्यामुळे विरोधक मुख्यमंत्र्यावर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

    प्रत्येकवेळी कोणी मिटींग घेतली म्हणून प्रत्येकाने उपस्थित राहायला पाहीजे असं नाही. कधी कुणाला अडचण असते, कधी कोणी कोरोनामुळे कॉरंटाईन असते. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नेहमी मुख्यमंत्र्याच्या बरोबर असणारे राजेश टोपे, मुख्यमंत्र्याचे सल्लागार सिताराम गुंठ्ठे यांच्यासोबत कॅबिनेट मध्ये चर्चा केली होती. लस कमी पडत असल्यामुळे यामध्ये चर्चा झाली होती. ही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. यामध्ये राजकारण आणि टीका करण्याच कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्या नेतृत्वाखाली अतिशय व्यवस्थितपणे सुरु आहे.”

    दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नसले म्हणून काही बिघडत नाही. देशात सर्वाधिक सुरळीत कारभार हा महाराष्ट्रातच सुरु असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.