मुख्याधिकारी निखील जाधव यांचा नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्याकडून सत्कार

कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव (Nikhil Jadhav) यांना दैनिक नवभारत व नवराष्ट्र वतीने राज्यपाल यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव (Nikhil Jadhav) यांना दैनिक नवभारत व नवराष्ट्र वतीने राज्यपाल यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  गेल्या अडीच वर्षांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी जाधव यांनी नगर परिषदेकडे पदभार स्वीकारला होता. मात्र, लगेचच महापूर सुरू झाल्याने यावेळी महापुर व काळामध्ये नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून जीवित व वित्तहानी न होता कौशल्याने परिस्थिती हाताळून लोकांना धीर देण्याचे काम केले होते. तसेच कोरोनाच्या काळामध्येही शासकीय कार्यक्रम व सूचना याची तंतोतंत पालन करुन तसेच पालिकेच्या वतीने स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा देण्याबरोबरच जास्तीत जास्त कोरोनाचा प्रसार होऊ दिला नव्हता.

  तसेच गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी प्रशासनही उतमप्रकारे हाताळले आहे, याची दखल घेत दैनिक नवभारत व ‘नवराष्ट्र’च्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी मुख्याधिकारी निखील जाधव यांची भेट घेऊन त्यांचा नगरपालिकेच्या वतीने सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड उपस्थित होते. याबरोबर कुरुंदवाड नगरसेवक किरण जोग, सामाजिक कार्यकर्ते भोला बारगीर, माजी नगरसेवक दीपक पोमाजे, सुरेश बिदगे आदी उपस्थित होते. सकाळपासून मुख्याधिकारी याचे अभिनंदन करण्यासाठी शहरवासीयांना मोठी गर्दी केली होती.

  “निखल जाधव यांनी पालिकेचे प्रशासन उत्तमप्रकारे हाताळणे बरोबर महापूर व कोरोना काळात कुरुंदवाड शहरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोच करुन त्यांची निवास व भोजनाची सोय चांगल्याप्रकारे केली होती. कुरुंदवाड शहरामध्ये राज्यपालांच्या हस्ते प्रथमच अशा प्रकारचा पालिका प्रशासनाला पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ”

  – जयराम पाटील, नगराध्यक्ष, कुरुदवाड

  मुख्याधिकारी निखील जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा सर्व स्वच्छता अभियान यामध्ये प्रशासन म्हणून उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याची पोचपावती म्हणून शहरास कचरामुक्त शौचालय मुक्त या अभियानात मानांकन प्राप्त झाले असल्याने कुरुंदवाडच्या गौरवशाली इतिहासात भर पडली आहे.

  – दीपक गायकवाड, उपनगराध्यक्ष