चीनची वाढली चिंता! पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ, एका दिवसात कोरोनाचे 31 हजार रुग्ण

चीनमध्ये झेंग्झौमध्ये शहरासोबतच अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलं आहे.

    चीन : दोन वर्षापासून जगावर असलेलं कोरोनाचं () संकट कधी जाणार की नाही याची काही शाश्वती नाही. अशातच कोरोनाची पसरण्यास सुरुवात झालेल्या चीनमधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. चीनमधे एका दिवसात सुमारे 31 हजार रुग्ण आढळल्याने आल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाच दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

    चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. चीनमध्ये बुधवारी 31000 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये 27,517 रुग्णांमध्ये लक्षणे नव्हती. तर, चिनमधील झेंग्झौ शहरात ( Zhengzhou ) गेल्या काही दिवसांमध्ये येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, येथील वेतनावरुन फॉक्सकॉन कारखान्यात हिंसक प्रदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलीस आणि हजारो कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते. यानंतर प्रशासनाने या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

     

    एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

    चीनमध्ये झेंग्झौमध्ये शहरासोबतच अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलं आहे. चीन प्रशासनाने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी चीनमध्ये 31,454 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये 27,517 रुग्णांमध्ये लक्षणे नव्हती. शुक्रवारपासून ते मंगळवारपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. झेंग्झौ शहर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अनेक शाळा, शॉपिंग मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोना चाचणीचा अहवाल असणं अनिवार्य आहे.