चीन सर्वाधिक कर्जबाजारी देश; भारतापेक्षा बांग्लादेशची अर्थव्यवस्था उत्तम

कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले, दुसरीकडे आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी खर्च मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक देश कर्जाच्या बोझ्याखाली दबले जात आहेत. भारत आणि शेजारील देशांची तुलना केली असता चीन सर्वाधिक कर्जबाजारी देश आहे(Debt-ridden countries of the world).

  दिल्ली : कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले, दुसरीकडे आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी खर्च मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक देश कर्जाच्या बोझ्याखाली दबले जात आहेत. भारत आणि शेजारील देशांची तुलना केली असता चीन सर्वाधिक कर्जबाजारी देश आहे(Debt-ridden countries of the world).

  यात पाकिस्तानची अवस्थाही खूप बिकट आहे. विशेष म्हणजे बांग्लादेशावर सर्वात कमी कर्ज आहे. जीडीपीच्या आकारानुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनवर सर्वाधिक कर्ज आहे. चीनवर जवळपास 13,009.03 अब्ज डॉलर इतके बाहेरील कर्ज आहे. मागील काही वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे.

  मात्र, चीनवर बाहेरील कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. चीनकडूनही या कर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, चीन आता जवळपास 1,447,448,228 लोकसंख्येमुळे सर्वात मोठा देश ठरला आहे. या लोकसंख्येनुसार, चीनच्या प्रत्येक नागरिकावर 8971.74 डॉलर इतके कर्ज आहे.

  पाकिस्तानवर रेकॉर्ड ब्रेक कर्ज

  स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, इमरान खान सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तानने 20.7 ट्रिलियन रुपयांचे कर्ज घेतले होते. पाकिस्तातावरील बाहेर कर्ज हे पहिल्यांदाच 50.5 ट्रिलियन पाकिस्तान रुपयांवर पोहचले आहे. डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास ही संख्या जवळपास 283 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. युनाइटेड नेशन्सच्या वर्ल्डोमीटरच्या आकड्यांनुसार, पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास 227,141,523 च्या वर आहे. लोकसंख्येप्रमाणे कर्जाचा विचार केल्यास पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकावर जवळपास 1230.50 डॉलर इतके कर्ज आहे.

  भारतात प्रत्येक नागरिकावर 407.14 डॉलर कर्ज

  भारताची एकूण लोकसंख्या जवळपास 1,399,791,068 वर आहे. मार्च 2021 या आर्थिक वर्षात भारतावर जवळपास 570 अब्ज डॉलरच्या वर बाहेरील कर्ज आहे. कोरोना काळातील आर्थिक वर्षात ही कर्जाची रक्कम 11.6 अरब डॉलरच्यावर पोहचली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकावर ही कर्जाची रक्कम 407. 14 डॉलरवर इतकी होते.

  बांग्लादेशची स्थिती भारतापेक्षा चांगली

  कर्जाच्या बाबतीत बांग्लादेशची स्थिती शेजारील देशांपेक्षा चांगली असल्याचे समोर आलेय. बांग्लादेशची लोकसंख्या जवळपास 166,303,498 इतकी आहे. या देशावर जवळपास 45 अरब डॉलर इतके कर्ज आहे. यामुळे लोकसंख्येप्रमाणे या कर्जाची विभागणी केली असताना प्रत्येक नागरिकावर 264.70 डॉलर इतके कर्ज आहे, चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत ही कर्जाची रक्कम कमी आहे, भारताच्या तुलनेतही ही संख्या निम्मी आहे.