चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात; करुणा मुंडेंचा हल्लाबोल

महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावरून करुणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. 

    पुणे : आज पत्रकार परिषद घेत करुणा मुंडे यांनी स्वतः चा नवीन पक्ष ‘शिवशक्ती सेना’ स्थापन केला असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावरून करुणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

    करुणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? 

    आज संपूर्ण महाराष्ट्रात २४ तासांत किती बलात्कार होतात, याची आकडेवारी किती आहे. याबाबत एकदा बघावे. मात्र संसदेत, मंत्रीमंडळात अनेक महिला असून कुणीही यासाठी पुढे धडजावत नाही. जेव्हा मी जेलमध्ये होती तेव्हाही माझ्यासाठी कुणीही उभे राहिले नाही. एकमेव चित्रा ताई होत्या. परंतु, त्यांनीही फक्त मिडियासमोर पाठींबा दिला. मात्र मी त्याला पब्लिसिटी स्टंट समजते. जेव्हा प्रत्यक्षात त्या मंत्र्याविरोधात कारवाई केली जाईल, त्याला मी आवाज उठवणे समजते’ असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.

    दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला. परंतु, जेव्हा उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्याविरोधात निदान एफआयआर दाखल करतील तेव्हा मी राज्यात शक्ती कायदा आहे, असे मानेल. सर्वांनाच माहिती आहे संजय राठोड यांच्याविरोधातील पुरावा काय आहे. त्यामुळे राज्याचे प्रधान या नात्याने त्यांनी निदान संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर तरी दाखल करावा.’