थंडीमुळे आंबा बागायतदाराना दिलासा

थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामुळे मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराला अवकाळी पावसाचा फटका बसला होता मात्र काही ठिकाणी वाचलेल्या मोहरावरील फळे सुपारीच्या आकाराची व थोडी मोठी झाली आहेत.

    रत्नागिरी : थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामुळे मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराला अवकाळी पावसाचा फटका बसला होता मात्र काही ठिकाणी वाचलेल्या मोहरावरील फळे सुपारीच्या आकाराची व थोडी मोठी झाली आहेत.

    थंडीचे सातत्य कायम असल्याने मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहरामूळे फळधारणा झाली असून, त्याचे प्रमाण 20 ते 25 टक्के आहे. सद्या सुरु असलेल्या थंडीमुळे झाडांनाही मोहर सुरू झाला आहे.

    या मोहराला फळ धारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. या वर्षी गुढीपाडव्याला आंबा बाजारात आला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला शिवाय ऑक्टोबर हीट ही चांगली झाल्याने नोव्हेंबर मध्ये थंडी सुरू होताच मोहर प्रक्रिया सुरू झाली परंतु दिवाळीत अवकाळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी मोहर कुजला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातातून निसटले आहे.

    पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पालवी सुरू झाली आहे .गेले काही दिवस थंडीचे प्रमाण चांगले असल्याने मोहर प्रक्रिया सुरू झाली आहे काही ठिकाणी फळधारणा ही सुरू झाली आहे हा आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे.