
खात्याचा संबंध नसताना वॉर रुमध्ये राज्यातील प्रोजेक्ट्सचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला. यावर विविध प्रतिक्रिया येत असून, अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या खात्यात देखील हस्तक्षेप व घुसखोरी करताहेत. अशी चर्चा सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे.
मुंबई : मविआ सरकारमध्ये अजित पवार हे आपणाला निधी देत नाहीत, म्हणून आपण सरकारमधून बाहेर पडलो, असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याच अजित पवारांसोबत शिंदे गट सत्तेत आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना निधीसाठी अजित पवारांची मनधरणी करावी लागत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या सरकारमधील सहभागामुळं शिंदे गटात धुसफूस व नाराजी असल्याचं बोललं जातंय. आता तर मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममध्ये अजित पवारांनी ढवळाढवळ केल्यामुळं अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डोईजड होत असल्याची चर्चा सुरु आहे. (Cold War between Eknath Shinde and Ajit Pawar from War Room; Ajit Pawar’s interference in Chief Minister’s warru, said Vijay Wadettiwar)
वॉर रुमवरुन कोल्ड वॉर…
दरम्यान, खात्याचा संबंध नसताना वॉर रुमध्ये राज्यातील प्रोजेक्ट्सचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला. यावर विविध प्रतिक्रिया येत असून, अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या खात्यात देखील हस्तक्षेप व घुसखोरी करताहेत. अशी चर्चा सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे. मुख्यमंत्र्याच्या वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाला आहे. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात मलिदा खायचं असेल तर मिळून खातात पण जनतेच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
अजितदादा विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी मी नगरविकास खात्याचा मंत्री असताना दादा तुम्ही माझ्या खात्याच्या परस्पर बैठका घ्यायचात. तेव्हा मी काही तुम्हाला कधी बोललो?, असा सवाल काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. यानंतर आता पुन्हा हे दोघे सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमवरुन अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.