राज्यात हुडहुडी, पारा घसरल्याने पसरली थंडीची लाट

राज्यातील काही भागात तापमानात घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे विदर्भात थंटीची लाट आली आहे. २२ डिसेंबरपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

    मुंबई : उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रातही तापमानात घट झाली आहे. सध्या सर्वत्र तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यात हुडहुडी भरली आहे.

    राज्यातील काही भागात तापमानात घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे विदर्भात थंटीची लाट आली आहे. २२ डिसेंबरपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या बहुतेक भागातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली.