कलर्स मराठी पुरस्कार सोहळा, रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा स्टाईलिश अंदाज

यावेळी प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली. रंगतदार स्किट्स आणि दर्जेदार डान्स परफॉर्मन्सेसमध्ये जल्लोषात हा पुरस्कार सोहळा रंगला.

    कलर्स मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात स्मॉल स्क्रीनवरील अनेक तारे-तारका उपस्थित होते. यावेळी कलर्स मराठीवरील सर्वच कलावंतांचा अनोखा स्वॅग पाहायला मिळाला…..रेड कार्पेटवर या सेलिब्रिटींनी एन्ट्री घेताच कॅमेराचा लखलखाट झाला. या सेलिब्रिटींनीदेखील हा सोहळा खूपच एन्जॉय केला.

    राजा राणीची गं जोडी, जय जय स्वामी समर्थ, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलावंत या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होती.

    यावेळी प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली. रंगतदार स्किट्स आणि दर्जेदार डान्स परफॉर्मन्सेसमध्ये जल्लोषात हा पुरस्कार सोहळा रंगला.  या दिमाखदार सोहळ्यात कुठल्या कलाकारांनी विजेतेपद पटकावलं हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.