कॅन्सरशी लढा देत असलेले कॉमेडियन ज्युनियर मेहमूद यांचं निधन, वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

कॉमेडियन ज्युनियर मेहमूद यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांन अखेरचा श्वास घेतला

    बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कॉमेडियन ज्युनियर मेहमूद, जो स्टेज 4 कर्करोगाशी झुंज देत होते, त्यांचं निधन (Junior Mehmood Passed Away) झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास  घेतला.  काही दिवसापुर्वीचं त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होतो. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालावली.

    आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

    ज्युनियर महमूदचे मित्र सलाम काझी यांनी माहिती देताना सांगितले की, महमूदला यांना फुफ्फुस आणि यकृताचा कर्करोग झाला होता. यासोबतच आतड्यात गाठ असल्याचेही समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा कर्करोग चौथ्या स्टेजमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. काही दिवस ते लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होते. काझी यांनी सांगितले की, ज्युनियर महमूद यांच्यावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता सांताक्रूझ पश्चिम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    रुपेरी पडद्यासोबत छोटा पडदाही गाजवला

    ज्युनियर मेहमूद यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. 1967 मध्ये आलेल्या ‘नौनिहाल’ या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांच्या कॉमेडीने सर्वांनाच प्रभावित केले. परिवार, कारवां, हंगामा, खोज, आपकी कसम, ब्रह्मचारी, फरिश्ता, विश्वास, प्यार ही प्यार, दो रास्ते, कटी पतंग, घर घर की कहानी, आं मिलो सजना, खून का कर्ज, कर्ज चुकना है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.  काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं.  एवढेच नाही तर त्यांनी 6 मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती.