अकोल्यात कंपनीला भीषण आग; २ कामगारांचा होरपळून मृत्यू

    अकोला (Akola) : अकोला खामगाव रोडवरील रिधोराजवळ असलेल्या ‘ईगल इन्फ्रा’ या कंपनीला भीषण आग (Fire News) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

    एका डांबराच्या टाकीचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र संजय पवार आणि आतिफ खान या दोन कामगारांनी आगीत आपला जीव गमावला आहे.