bjp and congress

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन असल्याचा दावा केला आहे(Congress connections of those who desecrated the statue of Chhatrapati; BJP leader claims).

    बंगळुरू : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाचे काँग्रेस कनेक्शन असल्याचा दावा केला आहे(Congress connections of those who desecrated the statue of Chhatrapati; BJP leader claims).

    काँग्रेस कनेक्शन असलेल्या तरूणाचे कर्नाटकमधील नेते डी.के. शिवकुमार यांच्यासह इतर नेत्यांचेही फोटो आहेत. तसेच हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते सी. टी. रवी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो, असे ट्विट केले आहे.

    सी.टी.रवी यांचे ट्विट

    काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा मी निषेध करतो. कर्नाटकमधील राजकीय वातावरण खराब करण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. त्यामुळे या कृत्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना प्रश्न विचारण्याचे धाडस करतील का? असा सवाल भाजपा नेते सी.टी.रवी यांनी उपस्थित केला आहे. यासोबत त्यांनी काही फोटोही ट्विटमध्ये जोडले आहे.