खेळाडूंचे अहवाल निगेटीव्ह आल्याने नाशिककरांना माेठा दिलासा

विदेशातून महाराष्ट्रात काल नोव्हेंबर मध्ये एक हजार नागरिक आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्राला धोका वाढला असून नाशिक शहरातही परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

  नाशिक,  दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॅान काेराेनाचा (Omicron Virus) नवा व्हेरीयंट आढळून  आल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना नाशिकमध्येही डोकेदुखी वाढली होती. दक्षिण आफ्रिकेत दर वर्षी एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धा आयोजित करण्यात येते.

  एप्रिलमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव असल्याने स्पर्धा नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्यात हाेती. या स्पर्धेत नाशिक मधून दोन खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता यामध्ये एकाने स्पर्धादेखील जिंकली आहे. त्यानंतर हे दोघे चार दिवसापूर्वी नाशिकमध्ये परतले असून नुकताच आलेला नवा दक्षिण व्हेिरयंट आफ्रिकेतच आढळल्याने नाशिकची चिंता वाढली होती.

  परंतु त्या दोघांचेही महापालिकेने घेतलेले नमुने निगेटीव्ह आढळल्याने माेठा दिलासा मिळाला आहे.

  मनपा शाळा १० डिसेंबर पर्यंत बंदच

  महापालिका हद्दीतील शाळा १ ते ७ वीचे वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता.परंतु काेराेनाचा धाेका लक्षात घेता १ डिसेंबरपर्यंत हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शिक्षण प्रशासन अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या अाहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे चित्र पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली.

  ३८ डॉक्टर आणि ८ हॉस्पिटलचे पथक तैनात

  सािहत्य संमेलन आयोजकांनी या नवीन व्हेिरयंटचा गांभीर्याने विचार करत पुढील नियोजन सुरू केले आहे . यामध्ये वैद्यकीय समितीने संमेलनात ३८ डॉक्टर आणि ८ हॉस्पिटलचे पथक तैनात केले आहे . त्यांना सहकार्य करण्यासाठी नर्स , रुग्णवाहिका यांचा समावेश असणार आहे . मुख्य सभामंडपाच्या आवारात एकूण ३ मेडिकल बूथ उभारण्यात आले असून व्हीआयपी कक्षाच्या मागे एक , प्रवेशद्वारावर दुसरा तर गझल कट्टाच्या मांगे तिसरा बूथ उभारण्यात येणार आहे . मास्क शिवाय कोणालाही प्रवेश नसेल तसेच कुसुमाग्रज नगरीत फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

  महापािलकेची यंत्रणा सतर्क

  महापालिकेने साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कंबर कसली असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सह महापालिकेचे १० डॉक्टर असलेले टीम तैनात करण्यात आली आहे ही हे पथक तीन ठिकाणी आलेल्या साहित्यप्रेमी प्रेमींचे स्क्रीनिंग करणार आहे. तपासणी केल्यानंतरच संमेलनस्थळी जाऊ देणार आहे.

  विदेशातून महाराष्ट्रात काल नोव्हेंबर मध्ये एक हजार नागरिक आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्राला धोका वाढला असून नाशिक शहरातही परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. असे काही नागरिक आढळून येताच त्यांची त्वरित तपासणी करण्यात येणार आहे.

  ओमिक्रॅानच्या पार्श्वभुमीवर साहित्य संमेलनात नो व्हॅक्सिन नो इंट्री चा निर्णय घेण्यात आला असून त्या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुचना दिल्या आहेत.