‘दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट’; अज्ञात ऑडिओ मेसेजनं खळबळ

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. या प्रकरणी एका व्यक्तिची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

    मुंबई :  मुंबईवर हल्ला करण्याची धमकी काही महिन्यापुर्वी देण्यात आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत अशीच धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती ही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक नियंत्रण कक्षात आज सकाळच्या सुमारास हा सात ऑडिओ क्लिप द्वारे मेसेज आल्याचं सांगण्यात येत आहे.

    यामध्ये एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.

    एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाची सूत्रं एका इसमाजवळ जाऊन थांबली. या व्यक्तिसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असं आढळून आलं की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे.” या व्यक्तिवर पोलिसांनी कोणती कारवाई केली की, नाही? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.