सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची टीका; १ लाख ५० हजार कोटी शासनाकडे वळवल्याचा आरोप

सहकाराने लहान माणसांना मोठे करण्याचे काम केलं. देशात महाराष्ट्र हा सहकाराची काशी आहे, मात्र याच महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाकडून सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगली येथे केली. येथील तरुनभारत स्टेडियमवर आयोजित सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

सांगली : सहकाराने लहान माणसांना मोठे करण्याचे काम केलं. देशात महाराष्ट्र हा सहकाराची काशी आहे, मात्र याच महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र कमकुवत करण्याचे षडयंत्र केंद्र शासनाकडून सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगली येथे केली. येथील तरुनभारत स्टेडियमवर आयोजित सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

एच. के. पाटील म्हणाले, आता सहकार क्षेत्र चुकीच्या दिशेने चालले आहे. सहकार खात्याने एक लाख पन्नास हजार कोटी रुपये शासनाकडे वळते केले आहेत, हे सहकार कमकूत करण्याचे षडयंत्र आहे. याविरोधात आवाज उठवायला हवा. महाराष्ट्र हा सहकाराची काशी आहे, ज्या क्षेत्रात सहकार नाही, त्या राज्यांची प्रगती झालेली नाही, हे सत्य आहे. हे प्रत्येक राजकर्त्यांनी, धोरणाकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं.

गुलाबराव पाटलांमुळे सांगलीच्या संस्था यशस्वी

सहकार क्षेत्राला खूप मोठे योगदान सांगलीतील नेत्यांनी दिले, आज या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभले. संसदेत त्यांनी सहकार बळकट करण्यासाठी नेहमीच पायाभूत भूमिका घेतल्या. गुलाबराव पाटील यांच्या जीवनप्रवास बघितल्यास आपल्याला त्यांचे सहकारी क्षेत्रातले शिक्षण आणि प्रशिक्षणावर असणारा त्यांचा अट्टहास पाहायला मिळतो. सांगलीच्या परिसरातील संस्थाचे यश हे त्यांच्या याच भूमिकांमुळे मिळाले आहे, असंही यावेळी ते म्हणाले.

सहकार माहिती नसलेले बाष्कळ बडबड करतात

ज्यांना सहकाराचा काहीच गंध नाही, असे लोक सहकाराची काशी असणाऱ्या महाराष्ट्रात येऊन सहकारावर बाष्कळ बोलू लागले आहेत, अशी टीका केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे नाव न घेता, पाटील यांनी केली. सहकार मोडण्याचा यांचा उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.