वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिचे वादग्रस्त वक्तव्यं

कंगणाच्या या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्याकडून पुरस्कार परत घ्या असा संतप्त सूर उमटत आहे. वाद आणि कंगणा हे एक प्रकारचे समीकरण आता झाले आहे. त्यामुळं कंगणा बोलण्यापेक्षा आता ती बरळली असा नाराजीचा सूर, आण संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत

  मुंबई : वादग्रस्त बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते, तसेच या वक्तव्यामुळं ती नेहमी वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. आता देखील कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात बोलताना म्हणाली की, ‘१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं आहे.’

  कंगणाच्या या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्याकडून पुरस्कार परत घ्या असा संतप्त सूर उमटत आहे. वाद आणि कंगणा हे एक प्रकारचे समीकरण आता झाले आहे. त्यामुळं कंगणा बोलण्यापेक्षा आता ती बरळली असा नाराजीचा सूर, आण संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत.

  कंगणा आणि वाद

  कंगनाने आता ‘१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं आहे.’ असं म्हणून नवीन वाद ओढावून घेतला आहे.

  अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर म्हणजे सप्टेंबर २०२० मध्ये ती वादग्रस्त वक्तव्यामुळं प्रचंड चर्चेत होती. बॉलिवूडमधये “कास्टिंग काऊच” चालते, तसेच बॉलिवूड हा पारंपरिक धंदा आहे, तुमचे कोणी नातेवाईक, आई, वडील, बहीण, भाऊ किंवा अन्य नातेवाईक असतील तरच, तुम्हाला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळतो, नाहीतर तुमच्यातील कौशल्य, पर्सनलिटी, सुंदरता, भाषा याला काहीही महत्त्व नाही असं बोलून कंगणाने एकच खळबळ माजवून दिली होती. यावर बॉलिवूडमधून बऱ्याच संतप्त आणि संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

  एवढे बोलून थांबेल ती कंगणा कसली, त्यानंतर कंगणाने पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य करुन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात बॉलिवूडमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, असे म्हणत कंगणाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला होता, त्यावेळी अनेक दिग्गज कलाकारांना बॉलिवूड कसे स्वच्छ आहे, आणि बॉलिवूडची प्रतिमा चांगली असल्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले होते. त्यावेळी तिने अभिनेता ऋतिक रोशन यांच्यावर सुद्धा लैगिंक छळाचे आरोप केले होते.

  दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना राणावतने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे कंगना विरुद्ध ठाकरे सरकार असं चित्र उभं राहिलं होतं. यावेळी कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या सरकारबाबत अत्यंत वादग्रस्त विधानं केली होती. याचदरम्यान, कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये तिच्या ऑफिसमधील काही भाग हा पाडून टाकण्यात आला होता. या सगळ्या प्रकारामुळे कंगना ही सातत्याने शिवसेनेवर हल्ला चढवत होती. त्यामुळे कंगना भाजपची कार्यकर्ती आहे अशीही तिच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती.

  दरम्यान त्या काळात कंगणाने मुंबईची ‘पाकव्याप्त काश्मीर’शी तुलना केली, यावेळी कंगणावर देशभरातून टिका झाली होती. तेव्हा भाजपचे मुंबईतील आमदार राम कदम, प्रवक्ते राहिलेले अवधूत वाघ अशी मंडळी कंगनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उतरली होती. यावेळी मुंबईवर टिका करणाऱ्या कंगणाला “मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते? अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.

  त्यानंतर कंगणाने सोशल मीडियावर व्यक्त होत होती. डिसेंबर २०२० मध्ये तिनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. कंगणानं जो फोटो इंस्टावर पोस्ट केला आहे त्यात टीएससीचा एक नेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, राक्षसी ताडका, सत्तेच्या चरणी नतमस्तक. कंगणाची ही पोस्ट वेगानं व्हायरल झाली होती, त्यानंतर बराच वाद झाला होता. आणि कंगणावर नेटकऱ्यांनी चांगलेच झाडपले होते.

  कंगना रणावत गेल्या काही काळात तिच्या महाराष्ट्र सरकारबरोबरच्या वादामुळं चर्चेत आली होती. आपल्या ती आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता तिचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेल्या लुकमुळे हि अभिनेत्री ट्रोल झाली होती, आणि जी देशभक्ती शिकवते, ती अर्धनग्न कपडे कसे काय परिधान करु शकते असा संतप्त सवाल त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.