‘माळा काढणाऱ्यांमुळेच तिसरी लाट’ इंदुरीकरांचं वादग्रस्त वक्तव्य, राजेश टोपे आणि तृप्ती देसाईंची खोचक प्रतिक्रीया

मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे. कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी नाही, मात्र ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार असल्याचं आणखी एक विधान इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, 'डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले' असं यावेळी सांगितल. यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

  “दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे. तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच.” असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात ते बोलत होते.

  इंदुरीकर महाराजांच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘इंदूरीकर महाराजांचे वक्तव्य हे सकारात्मक दृष्टीने घ्यावं असंही टोपे यांनी म्हटलंय. इंदुरीकरांचा हेतू हा शाकाहरीला प्रोत्साहन देण्याचा आहे. त्यामुळं ते त्या हेतूने बोलले असतील. त्यामुळं त्याचं व्यक्त चांगल्या हेतूने घ्यायला हवं,’ असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

  वारकरी संप्रदायाच्या नावावर गैरसमज पसरवणे चुकीचं – हमीद दाभोलकर

  “इंदुरीकर महाराज यांनी ‘माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार आहे’ अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. माझ्यामते ते अशास्त्रीय विधान आहे. करोना कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी शासन आपल्याला परत परत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देतंय. करोना हा एक विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यापासून प्रतिबंध करायचा असेल तर आपण सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाच्या नावावरती करोनाविषयी असे गैरसमज पसरवणे चुकीचं आहे.” अशी प्रतिक्रीया अनिसचे हमीद दाभोलकर यांनी दिली आहे.

  इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा – तृप्ती देसाई

  “आरोग्यमंत्री राजेश टोपे तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही इंदोरीकर महाराजांना दरवेळी पाठीशी का घालताय? आपल्या राज्यात सर्वांना समान न्याय आणि समान कायदा नाही का. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,” असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

  नेमकं काय म्हणाले इंदुरीकर?

  मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे. कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी नाही, मात्र ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार असल्याचं आणखी एक विधान इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, ‘डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले’ असं यावेळी सांगितल. यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.