Controversy over Konkan refinery project; BJP claims that it will soon pay homage to the refinery in Rajapur

राजापूरमधील बारसू धोपेश्वरमध्ये प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन होणार आहे, असा दावा भाजपा प्रवक्ते प्रमोद जठार यांनी केला आहे. यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्र सरकारच्या भेटीलाही जाणार असल्याचे ते म्हणाले(Controversy over Konkan refinery project; BJP claims that it will soon pay homage to the refinery in Rajapur).

    राजापूर : कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून वातावारण तापत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा गेल्या आठवड्यात तीन दिवसांचा कोकण दौरा झाला. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीसाठी रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू धोपेश्वरच्या जमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. त्याचवेळी स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. आता रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजापूरमधील बारसू धोपेश्वरमध्ये प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन होणार आहे, असा दावा भाजपा प्रवक्ते प्रमोद जठार यांनी केला आहे. यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्र सरकारच्या भेटीलाही जाणार असल्याचे ते म्हणाले(Controversy over Konkan refinery project; BJP claims that it will soon pay homage to the refinery in Rajapur).

    कोकणातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. रिफायनरीमुळे येणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याने रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. असे जठार यांनी सांगितले. दरम्यान, नाणार प्रकल्पाची प्रस्तावित रिफायनरीची अधिसूचना यापूर्वीच रद्द झाली आहे.

    आता हा रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या बाससू धोपेश्वर येथे व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, इथेही स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या आठवड्यात चार दिवसांपूर्वी राजापूर तहसीलदार कार्यालयावर प्रकल्पाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता.