New Covid variant Omicron: Dombivali followed by Pune found six patients of Omicron; Excitement in Maharashtra

राज्यात काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ऑमीक्रोनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांमधील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे(Corona doubles in the country! 82,402 active patients and 252 omicrons; Mass contagion in Mumbai-Pune?).

    मुंबई : राज्यात काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ऑमीक्रोनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांमधील कोरोना रुग्णांचे आकडे पाहता मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे(Corona doubles in the country! 82,402 active patients and 252 omicrons; Mass contagion in Mumbai-Pune?).

    वेगाने वाढणारी रुग्णसंख्या आणि ऑमीक्रोनचा संसर्ग पाहू जाता टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली तर तज्ज्ञांनीही कोरोनाची ही तिसरी लाटच असल्याचे म्हटले आहे. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यांमधून मुंबई आणि पुण्यात ऑमीक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करुन मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना निर्बंध कठोर करण्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

    पॉझिटिव्हीटी रेट 2.3%

    देशातील आठ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून जास्त आहे. तर 14 जिल्हे असे आहेत जिथे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76 टक्के होता. तो आता 2.3 टक्के आहे. तर बंगालमध्ये 1.61 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता जो आता 3.1 टक्के इतका झाला आहे.

    ट्रॅव्हल हिस्ट्री नाही तरीही…

    विशेष म्हणजे ऑमीक्रोनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला नसल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात ऑमीक्रोनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ऑमीक्रोनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांना जाणवणारी लक्षणे सौम्य आहेत. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

    तज्ज्ञ म्हणतात…

    कोरोनाची दुप्पट रुग्णवाढ हे ऑमीक्रोनची लक्षणे दाखवते. पण गेल्या काही दिवसांपासून आढळून आलेल्या रुग्णांच्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालाची प्रतीक्षा असून यानंतर या संसर्गात ओमीक्रोनचा वाटा किती आहे हे कळेल. सध्या हा संसर्ग ऑमीक्रोनन आणि डेल्टाचं संयुक्तीकरण दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    …तरच लॉकडाऊन

    जर कोरोनाच्या संसर्गामुळं आरोग्य व्यवस्थेत मोठा ताण यायला लागला तरच सरकारकडून लॉकडाऊन लावला जाईल, तोपर्यंत लॉकडाउन लागू होणार नाही. त्यामुळे लॉकडाउन टाळायचा असेल तर लोकांनी नियमांचे पालन करायलाच हवे, असे टास्क फोर्स तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांचे मत आहे.

    मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी

    मुंबईत समूह संसर्ग वाढत असून मुंबई तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे भाकीत राज्य कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यानी केले आहे. त्यामुळे नव वर्षाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी 7 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.