चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्रेक; येत्या काही महिन्यांत ८० कोटी लोकांना संसर्ग होण्याची भीती

चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. औषधांच्या दुकानांतील औषधेही संपत आली असून उपचार मिळावेत म्हणून रुग्ण हे डॉक्टरांसमोर हतबल झाले आहेत. ताप कमी करण्यासाठी आयांकडून बटाट्याचा वापर होतो आहे. जिंग प्रांतातील स्मशानभूमीमध्ये चोवीस तास अंत्यसंस्कार सुरू असून आता अनेक ठिकाणांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

    बिजिंग – चीनमध्ये शून्य कोरोना (Zero Covid) धोरण संपुष्टात आणल्याने २१ लाख मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लसीकरणाचे कमी प्रमाण आणि अँटीबॉडीज (Antibodies) घटल्याने येथे कोरोनाचा उद्रेक झाल्याचे लंडनस्थित ‘ग्लोबल हेल्थ एअरफिनिटी’ (Global Health Airfinity) या संस्थेचे म्हणणे म्हणणे आहे. तसेच, संसर्ग दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून येत्या काही महिन्यांमध्ये ८० कोटी लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.

    चीनमध्ये कोरोनाची (Covid In China) परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. औषधांच्या दुकानांतील (Medical Shops) औषधेही संपत आली असून उपचार मिळावेत म्हणून रुग्ण हे डॉक्टरांसमोर हतबल झाले आहेत. ताप कमी करण्यासाठी आयांकडून बटाट्याचा वापर होतो आहे. जिंग प्रांतातील (Jing Province) स्मशानभूमीमध्ये चोवीस तास अंत्यसंस्कार सुरू असून आता अनेक ठिकाणांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

    दरम्यान, चीन सरकार मृतांचा खरा आकडा लपवीत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य क्षेत्रातील जाणकार चीनमधील ताज्या परिस्थितीसाठी देशाच्या धोरणाला जबाबदार ठरवीत असून लोकांमधील प्रतिकारक्षमता वाढविण्याऐवजी बचावात्मक धोरणावर अधिक लक्ष दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

    चीन सरकारने आताच हा निर्णय का घेतला याचे कारण कळायला काही मार्ग नाही. चिनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होऊ शकते. तसेच, लोकांच्या प्रवासाचे प्रमाणही वाढेल. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील उद्रेकानंतर सर्व व्यवहार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीच. सरकारने लसीकरण, जनजागृती आणि आरोग्यव्यवस्था बळकट करावी. नागरिकही लॉकडाउनला वैतागले असून लॉकडाउन काढण्यासाठी आंदोलनेही झाली होती, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील साथरोगतज्ज्ञ झेंगमिंग चेन यांनी सांगितले.