
देशात आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’लाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 16 मार्चपासून या सर्वांसाठी नवा लसीकरण कार्यक्रम सुरु होणार आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडवीय यांनी ही माहिती दिली(Corona vaccine for children aged 12 to 14 from March 16; 60+ Booster for everyone).
दिल्ली : देशात आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’लाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 16 मार्चपासून या सर्वांसाठी नवा लसीकरण कार्यक्रम सुरु होणार आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडवीय यांनी ही माहिती दिली(Corona vaccine for children aged 12 to 14 from March 16; 60+ Booster for everyone).
मुलांना शाळेत पाठवा
3 जानेवारी 2020 पासून 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. यामुळे शाळाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. आता 12 वर्षापासूनच्या मुलांना लस दिल्यास त्यांनाही शाळेत पाठविण्यास अडचण होणार नाही.
दरम्यान, सध्या भारतात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरु आहे. तसेच 60 वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर गंभीर आजार आहेत अशांनाच बूस्टर डोस घेता येत आहे. पण आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार, 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठांना सरसकट बूस्टर डोस घेता येणार आहे.