धक्कादायक ! लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह

पिंपरी-चिंचवडमध्ये दिघीमधील (Crime in Pimpri) एका लॉजमध्ये जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीचा खून (Murder) करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये दिघीमधील (Crime in Pimpri) एका लॉजमध्ये जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीचा खून (Murder) करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामधील ३० वर्षीय आरोपी प्रकाश ठोसरने आधी प्रेयसीचा खून केला. नंतर त्याने स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि ३० वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दिघी परिसरातील एका लॉजमध्ये नेहमी भेटायचे. हे दोघे अनेकदा रात्री मुक्कामी यायचे आणि सकाळी निघून जायचे असं पोलिसांनी सांगितले आहे. काल रात्री हे दोघे लॉजवर आले होते. त्यानंतर आज सकाळी चेक आऊट करण्याचा वेळ झाला तरी या दोघांनी रूमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तेथील कामगाराने दरवाजा ठोठावला. मात्र, बऱ्याच वेळानंतर देखील ते दरवाजा उघडत नसल्याने याची माहिती दिघी पोलिसांना देण्यात आली.

    पोलिसांनी लॉजवर येऊन दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला. तेव्हा प्रकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर खाली जमिनीवर ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांच्याही शरीरावर कपडे नव्हते. प्रथमदर्शनी प्रकाशने विवाहित प्रेयसीचा खून करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.