Covid 19 Updates : राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना, मास्कसह कोरोनोच्या सर्व नियमांचं पालन करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन

नागरिकांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांसबंधित जागरुकता (Corona 19 Virus Updates) करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi यांनी राज्यांना दिल्या आहेत.

  नवी दिल्ली : मास्कसह (Mask) कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन (Covid 19 Rules) करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच येणारे सण (Festivals) आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebrations) राज्यांनी सतर्क (Alert) राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यांमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

  सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत दिल्या आहेत. लसीकरणासह सतर्क राहणं महत्त्वाचं असल्याचं सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं. तसेच कोरोना नियमांसंदर्भात जनतेत पुन्हा जागरुकता आणावी अशा सूचना त्यांनी राज्यांना दिल्या.

  बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत कुठल्याही सक्तीच्या नियमांची घोषणा करण्यात आली नाही. पण जिनोम सिक्वेंसिग आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  राज्यांनी अलर्ट राहावं, पंतप्रधान मोदींची सूचना

  आजच्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ कमी असली तरीही जगभरात मात्र ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

  सर्व राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करत रुग्णालयं सज्ज ठेवावीत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींच्या लसीकरणावर भर द्या असंही ते म्हणाले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं.

  बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत कुठल्याही सक्तीच्या नियमांची घोषणा करण्यात आली नाही. पण जिनोम सिक्वेंसिग आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  Covid 19 Updates: राज्यांनी अलर्ट राहावं, मोदींची सूचना