पतसंस्थेच्या कर्जाचा डोंगर आणि नापिकीमुळे झाला त्रस्त; अखेर शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

आपल्याकडे असलेल्या १० एकर जमिनीतून झालेल्या धानाची त्याने मळणी केली. मळणीअंती केवळ २५ ते २६ पोते धानाचा उत्पन्न झालं. हाती आलेल्या धानाला विकूनही कर्जाची परतफेड होणार नाही. मग करायचे काय? सहकारी संस्थेचा कर्ज, वीज बिल आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेली उसनवार हे सर्व चित्र त्या तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. काल रात्रीच्या सुमारास आपल्या खोलीतच त्या शेतकऱ्याने दुपट्टयाच्या साहाय्याने ............

    गडचिरोली (Gadchiroli) : करोना महामारीमुळे रोजगार हिरावला गेल्याने मजूर वर्ग आणि शेतकरी हवालदिल झाला होता. अनेकजण कर्जबाजारी करून कसेबसे आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्नात होते. यंदातरी आपल्याकडे असलेल्या शेतात धानाचे चांगले उत्पन्न होईल या आशेवर असतानाच शेतीने सुद्धा दगा दिल्याने तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज पहाटेस गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली. विजय मुकुंदा सावसाकडे रा.वाढोना तालुका कुरखेडा असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

    विजय सावसाकडे या तरुण शेतकऱ्याकडे १० एकर धानाची शेती होती. यावर्षी धानाची शेती करण्यासाठी त्याने सहकारी संस्थे कडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतला होता. शेतातील पंपाचे वीज बिल १ लाख २० हजार रुपये त्याच्याकडे थकित होते. एवढेच नव्हेतर गेल्या वर्षी करोना महामारी मध्येच त्याने आपल्या मुलीचं लग्न केलं होतं. लग्नासाठी त्याने कर्ज घेतल्याची गावात चर्चा आहे.

    ९ डिसेंबर रोजी आपल्याकडे असलेल्या १० एकर जमिनीतून झालेल्या धानाची त्याने मळणी केली. मळणीअंती केवळ २५ ते २६ पोते धानाचा उत्पन्न झालं. हाती आलेल्या धानाला विकूनही कर्जाची परतफेड होणार नाही. मग करायचे काय? सहकारी संस्थेचा कर्ज, वीज बिल आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेली उसनवार हे सर्व चित्र त्या तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. काल रात्रीच्या सुमारास आपल्या खोलीतच त्या शेतकऱ्याने दुपट्टयाच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा आप्त परिवार होता.

    गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने वरच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. त्यातच अवकाळी पाऊस, वन्य प्राण्यांनी केलेल्या शेतीची नासधूस, कृषिपंपांचा वीजबिल अश्या परिस्थितीवर मात करून कसेबसे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मात्र धानाचे उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने कर्जाची परतफेड कसे करायचे या चिंतेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. विजय सावसाकडे सारखा तरुण शेतकरी सुद्धा कर्जबाजारीचा संकटात अडकल्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून त्याचा मृतदेह कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे.