अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीटीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडून  मदतीची मागणी

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात दोन दिवसापासून वादळी पवसासह गारपीटीमुळे कापूस,तुर, गहु, हराभरा, संत्रा पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हवालादिल झाले आहेत.

    वेचणीला आलेल्या कपाशी चे बोंड पूर्णपणे ओले झाल्याने ते आता वेचणीच्या ही लायकीचे राहिले नाही उर्वरित कपाशीचे गोंडी सुद्धा पावसामुळे सडलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मोठा अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.